राजकुमार गडकरी
शिर्डी ( प्रतिनिधी) जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकावत आणि राष्ट्रगीत गायन करत भारताचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे आता जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से सर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
द्वारका डोखे या अहिल्यानगर जिल्ह्याच्या सुपुत्री असून, त्यांनी यापूर्वीही महिलांसाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे.
या मोहिमेसाठी त्यांनी मंगळवारी 8 एप्रिल 2025 रोजी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते डोखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे उपस्थित होते. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महाराष्ट्रातील महिला द्वारका विश्वनाथ डोखे ह्या असून, त्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. द्वारका डोके यांनी या 50 वर्षांच्या असताना सण 2024 मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर केला होता.त्या 2006 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या आहेत.
त्यांनी या प्रवासासाठी "साद देती हिम शिखरे" या पुस्तकाकडून प्रेरणा घेतली होती.
त्यांना प्रशिक्षक पासंग शेरपा यांनी मदत केली होती. आता त्या जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments