त्यांचे सावळीविहीर येथे व रस्त्यानेही ठीक ठिकाणी साईभक्त, ग्रामस्थांकडून स्वागत झाले. पांढरा कुर्ता डोक्याला पांढरा पटका, पांढरी दाढी व हातात छत्री घेऊन भर उन्हामध्ये ते उलटे पायी चालत शिर्डीला येत होते. सावळीविहीरला आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण गेल्या 48 वर्षापासून शिर्डीला उलटे पायी चालत येत असून वर्षातून रामनवमी, दसरा ,गुरु पौर्णिमा, दीपावली, अशा वर्षातून पाच वेळा भरुच ते शिर्डी उलटे पायी चालत शिर्डीला साई चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो
. पूर्वी न जेवता, अनवाणी, कुठेही न थांबता , न बोलता येत होतो त्यामुळे पाच दिवस सलग रात्रंदिवस उलटे चालून शिर्डीला पोहोचत होतो.मात्र आता रस्त्याने अनेक जण थांबवतात. प्रेमाने बोलतात. त्यामुळे उशीर लागतो. आता वीस दिवसात भरूत ते शिर्डी आलो. आपण उलटे पायी चालत संपूर्ण तीन वेळा नर्मदा परिक्रमा तसेच भारत भ्रमण केली आहे. विश्व कल्याण, शांतीसाठी आपण ईश्वरचरणी , साई चरणी अशा परिक्रमेतून आपण प्रार्थना करतो .आपण उलटे चालतो मात्र या जगाच्या व्यवहारात कोणीही उलटे चालू नये. अशीच यातून शिकवण आपण देत असतो. मनुष्याला दिलेलं शरीर , आत्मा हा परमेश्वरांनी दिलेला आहे. शरीर हे श्वासावर चालते. मात्र व्यक्ती हा विश्वासावर चालत असतो. मी उलटे चालतो हे सर्व बघतात. मात्र आपण स्वतः उलटे करतो ते दिसत नाही. ते प्रत्येकाने पाहिले पाहिजे व व्यवहारात जीवनात सरळ चालले पाहिजे. साईबाबा म्हणजे सा म्हणजे सारे व ई म्हणजे ईश्वर असे साऱ्यांचे ईश्वर आहेत. ते सबका मालिक एक आहेत सर्वधर्मसमभावाची शिकवण त्यांनी संपूर्ण विश्वाला दिली आहे. आपण सर्वांनी त्यांची शिकवण आचरणात आणली पाहिजे. व जो संतांना नावे ठेवतो व स्वतः मोठा संत समजतो. तो संतच नाही. तेव्हा आपण सर्व एक आहोत ,हे विश्व एक आहे.असे सांगत आपला पवित्र नर्मदा किनारी मिनी शिरडी कीर्ती धाम आश्रम आहे. तेथे नर्मदा परिक्रमा करणारे अनेक जण महाराष्ट्रातीलही येतात ,थांबतात, सत्संग होतो. त्यामुळे शिर्डीला उलटे पायी चालत येताना महाराष्ट्रातही मोठा भाविकांचा सत्संग मिळत असतो. प्रेम मिळत असते.असे यावेळी संत विश्वगुरू स्वयंसाई सद्गुरुजी महाराज यांनी बोलताना सांगितले.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments