अध्यात्मिक प्रवासात नवदुर्गेची कृपा आणि कुंडलिनी शक्तीची जागृती ही आत्मसाक्षात्कार आणि जीवनातील उच्च उद्दिष्टे साध्य करण्यास करते मदत-----श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी) राजकुमार गडकरी 
कुंडलिनी ही आपल्या शरीरातील सुप्त ऊर्जा आहे, जी पाठीच्या कण्याच्या तळाशी मूलाधार चक्रात वसलेली असते. तिची जागृती साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. शरीरात एकूण सात प्रमुख चक्रे आहेत, ज्यांच्या जागृतीने साधकाला आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूपता साधता येते. असे श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. 
त्यांनी पुढे म्हटले आहे की,चैत्र नवरात्रीत उपासना आणि चक्र जागृती महत्वाचे ठरते.चैत्र नवरात्रिच्या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी एका विशिष्ट देवीची उपासना करून संबंधित चक्रांची जागृती साधता येते: पहिला दिवस हा - शैलपुत्री देवीची उपसना केल्यानेमूलाधार चक्र जागृती होते. हे चक्र स्थिरता आणि मूलभूत ऊर्जेशी संबंधित आहे.दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेचा असून या दिवशी स्वाधिष्ठान चक्र जागृती होते. हे चक्र सर्जनशीलता आणि भावनांशी संबंधित आहे.
तिसरा दिवशी चंद्रघंटा देवीची उपासना केली की मणिपूर चक्र जागृती होते.हे चक्र आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचे केंद्र आहे.चौथा दिवस हा कूष्मांडा देवीच्या उपासनेचा असून या उपासनेमुळे अनाहत चक्र जागृती होते. हे चक्र प्रेम, करुणा आणि संतुलनाशी संबंधित आहे. पाचवा दिवस हा स्कंदमाता देवी उपासनेचा असून त्यातून विशुद्ध चक्र जागृतीहोते. हे चक्र संवाद आणि अभिव्यक्तीचे केंद्र आहे.
सहावा दिवस - हा कात्यायनी देवीच्या उपासनेचा असून आज्ञा चक्र जागृती होत असते.हे चक्र अंतर्ज्ञान आणि ज्ञानाचे केंद्र आहे.सातवा दिवसहा कालरात्रि देवीच्या उपासनेचा असून त्यातून सहस्रार चक्र जागृती होते. हे चक्र आध्यात्मिक जागरूकता आणि ब्रह्मांडीय चेतनेचे केंद्र आहे.तर आठव्या दिवशी महागौरी देवी ची उपासना केली की सर्व चक्रांचे संतुलन आणि शुद्धीकरण होते. आणि शेवटच्या
नववा दिवशी सिद्धिदात्री देवीच्या उपासनेने पूर्ण आत्मसाक्षात्कार आणि सिद्धी प्राप्ती होते.व असे या चैत्र नवरात्रीत जो सातत्य श्रद्धाने संयम ठेवून उपासना करतो त्यास नवदुर्गेची कृपा होते. असे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले. या चैत्र नवरात्रि मध्ये श्री नर्मदेश्वर सेवाधामचे
महंत आत्माराम गिरी यांनी या नऊ दिवसांच्या उपासनेत प्रत्येक दिवशी संबंधित देवीची उपासना करून संबंधित चक्रांची जागृती अनुभवली. या प्रक्रियेत त्यांनी कुंडलिनी शक्तीची उन्नती आणि नवदुर्गेचा साक्षात्कार घेतला. या अनुभवामुळे त्यांना आत्मानुभूती प्राप्त झाली आणि त्यांनी सर्व भक्तांच्या सुख, समाधान आणि शांततेसाठी नवदुर्गेची प्रार्थना केली. त्यांनी या नऊ दिवसात मौन बाळगले चैत्र नवरात्र संपल्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की,कुंडलिनी जागृती ही अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे. त्यामुळे, अनुभवी गुरुंच्या मार्गदर्शनाखालीच ही साधना करावी. योग, ध्यान, प्राणायाम आणि बीजमंत्रद्वारे कुंडलिनी शक्तीची जागृती साधता येते. साधनेत सातत्य, श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे.
आपल्या आध्यात्मिक प्रवासात नवदुर्गेची कृपा आणि कुंडलिनी शक्तीची जागृती आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि जीवनातील उच्च उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल. त्यासाठी साधना व साधने मध्ये सातत्य श्रद्धाने संयम आवश्यक आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments