दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02 -छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार दि.02 बुधवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली कन्या दिन साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी पीसीपीएनडीटी या कायद्याच्या जनजागरणासाठी दि.02 बुधवारी कन्या दिन साजरा करण्यात यावा असे निर्देश दिले होते.दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनाजी.डी.खंदारे यांनी उपस्थितांना कन्या दिना निमित्त स्त्री-पुरुष समानतेची शपथ दिली. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शितल डोके, डॉ.रमेश चव्हाण, डॉ. खालेद झाकी,सुनील वानखेडे, अतुल मुळे, सोनाली झिंजे, वर्षा ठोंबरे, सपना मिसाळ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला यांची उपस्थिती होती.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments