बाभळेश्वर ( प्रतिनिधी). श्री सद्गुरु बाळूमामा यांची पालखी व मेंढ्या राहाता तालुक्यातील बाभळेश्वर या गावामध्ये येणार असून त्या निमित्ताने या बाळूमामा यांच्या पालखीची व मेंढ्यांची पालखी मिरवणूक दि.3/4/2025 वेळ सकाळी 11 वाजता बाभळेश्वर चौक ते दूध संघापर्यंत निघणार आहे व सायंकाळी आठ वाजता बाळूमामांची आरती व प्रवचन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे .सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे. असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी, बाभळेश्वर तालुका राहाता यांनी केले आहे.
, . श्री संत बाळूमामा हे एक मराठी संत होते. त्यांची मोठी धार्मिक कथा आहे. ते मेंढरे चारण्यासाठी गावाबाहेरच्या जंगलात जात असत.
बाळूमामा यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यव्वा आरभावे या जोडप्याच्या पोटी झाला होता.
त्यांचा जन्म आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ (दि. ३ ऑक्टोबर १८९२) रोजी झाला होता.
त्यांना कन्नड आणि मराठी भाषा येत होत्या.
ते मेंढरे चारण्यासाठी सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असत.तो आणि त्याची मेंढरे गावाबाहेरच्या जंगलात तळ ठोकून असत.१९६६ मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात बाळूमामा यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी समाधी घेतली.
कर्नाटकातील निपाणी आणि महाराष्ट्रातील राधानगरी यांच्यामध्ये असलेल्या आदमापूरमध्ये त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक मंदिर बांधण्यात आले आहे. तिथे मोठी यात्रा भरते. त्याचप्रमाणे बाळूमामाच्या मेंढ्या व पालखी ठिकठिकाणी जात असते तेथे धार्मिक पूजा विधी मिरवणूक आरती महाप्रसाद आदी कार्यक्रम होत असतात. असाच संत बाळूमामा यांच्या पालखी व मेंढ्यांचा मुक्काम बाभळेश्वर येथे असून तीन एप्रिल 2025 रोजी सकाळी अकरा वाजता बाभळेश स्वर चौक ते श्रीरामपूर संघापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सायंकाळी आठ वाजता येते बाळूमामाची आरती व प्रवचन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी दर्शनाचा व महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे समस्त ग्रामस्थ बाभळेश्वर तालुका राहता यांनी म्हटले आहे.
0 Comments