तालुक्यातील मौजे-शिंदोळ येथे कन्या दिन उत्साहात साजरा-
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हे चिंताजनक असल्याने,मुलींचा जन्मदर वाढविणे आवश्यक आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात,छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या त्री सुत्री कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रसार/प्रचारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिंदोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय शिंदोळ यांच्या संयुक्त विद्यमाने कन्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित विद्यार्थ्यीनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रूजू असलेले ग्रामपंचायत ट्रेनी जगदीश सोनवणे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी,विद्यार्थिनी व ग्रामस्थांना स्त्री-पुरूष समानतेची शपथ दिली, ग्रामसेवक सुशिल मोरे यांनी थोडक्यात या कार्यक्रमा मागची पार्श्वभूमी सांगितली व मुख्याध्यापक सतिश महाजन यांनी सर्वांचे आभारप्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा स्वयंसेविका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद,माता पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments