गुढी पाडव्यास आध्यत्मिक महत्व असलेल्या नक्षत्र वृक्ष कडू लिंब, बेल, मंदार चे हरितवारीतुन विविध मंदिरात रोपन --



दिलीप शिंदे सोयगाव
 सोयगाव दि.30-  कडुलिंबाचे झाडाचे गुढी पाडव्यास   पूजन करून त्याच्या कोवळ्या फुलांची चटबी प्रसाद म्हणून खाण्याची पुरातन परंपरा आहे. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते व कडू रस हा शीतलता देणारा असतो. हिवाळ्यात साचलेला कफ दोष कडू लिंबाचे पाने सेवन केल्याने कमी होतो. हा वृक्ष उत्तरा भाद्र नक्षत्राचा आराध्य वृक्ष असून शनी हा याचा स्वामी आहे. शनी हा संकट निवारक असून  हा वृक्ष ही विविध विषाणू, जिवाणू आदी संसर्ग जन्य आजार रोखणारा ( जिवाणू विरोधी गुणधर्म) असल्याने संकट निवारक ठरतो. मराठी व हिंदू नववर्षाची चैत्र महिन्या पासुन सुरुवात होते.

 अश्विनी नक्षत्र हे हिंदू वर्षातील पहिले नक्षत्र पाडव्यास सुरु होते. त्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष बेल तसेच याच महिन्यात  पौर्णिमा पासुन सुरु होणाऱ्या चित्रा नक्षत्राचा आराध्य मंदार चे रोपण ही जैवविविधता संवर्धन हेतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण संवर्धक उपक्रमातून दत्त आश्रम व इतर मंदिराच्या प्रांगणात महंत बाबा लहाने महाराज यांचे हस्ते करण्यात आले.मंदार हा अनेक फुलपाखरे यांचा होस्ट प्लॅन्ट ( अंडी घालणे) आहे.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments