दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.30 - सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील गणेश कापरे या युवकाने संघर्षातून सोयगाव-बनोटी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ स्वादिष्ट जेवणाचा (ढाबा) व्यवसाय नवीन वर्षाच्या सुरुवातीला दि.30 रविवारी रोजी महाराष्ट्र ढाब्याचे उदघाटन करण्यात आले.
दरम्यान सौ.स्वाती प्रवीण फुसे व सौ.पूजा आकाश फुसे या दाम्पत्यांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी आमखेडा सरपंच गजानन ढगे, शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) दिलीप मचे, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, रघुनाथ काटोले, भास्कर चौधरी,गजानन गव्हाड,ईश्वर इंगळे,दिलीप शिंदे,अनिल लोखंडे,संजय मिसाळ,दत्तू काटोले,अंबादास जाधव,सिकंदर तडवी,दिनेश सोनवणे,अजय इंगळे,साहेबराव सोनवणे,राजू गव्हाड,विठ्ठल पाटील,गजानन बडक,अनिल ठाकरे,संजय कापरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी गणेश कापरे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments