गुढीपाडव्यानिमित्त श्री साई मंदिराचे कळसावर उभारण्यात आली गुढी!

राजकुमार गडकरी 

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍थेच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने यु एस ए येथील दानशुर साईभक्‍त श्री तारेश आनंद, यांच्‍या देणगीतून श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली आहे.

तसेच आज रविवारी गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांचे हस्ते सकाळी   गुढीची विधीवत पुजा करुन श्री साईबाबा मंदीराचे कळसावर गुढी उभारण्‍यात आली. यावेळी श्री साईबाबा संस्‍थनचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के), उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ  वैशाली दराडे , लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते. मराठी नव वर्ष व गुढीपाडव्यानिमित्त शिर्डीमध्ये अनेक साई भक्तांनी येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments