दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.30- धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 336 व्या बलिदान दिनानिमित्त दि.29 शनिवारी सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली होती. शहरातील जुना बाजार चौक येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात शहरासह परिसरातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 336 व्या बलिदान दिनानिमित्त शनिवारी रात्री पेटवलेली मशाल व युवकांच्या हातात असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पोस्टर हातात घेऊन मुक पदयात्रा दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथून प्रस्थान करीत भवानीनगर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, वाल्मिक नगर,नारळीबाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक,सोयगाव बसस्थानक मार्गाने क्रमस्थ होत रामजीनगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिर येथे मूक पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत शहरासह परिसरातील सकल हिंदू समाजातील बालक,नवतरुण व वयोवृद्ध बांधव हे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त निघालेल्या मूक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे .)
0 Comments