राजकुमार गडकरी
शिर्डी (प्रतिनिधी) नव्याने मंजूर झालेल्या शिर्डी एमआयडीसी सावळीविहीर येथे निंबे ऑर्डिनन्स ग्लोबल लिमिटेड या अत्याधुनिक सरंक्षण शेल उत्पादन कंपनीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा (गोदावरी कृष्ण खोरे विकास महामंडळ )तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवार 31 मार्च 2025 रोजी शिर्डी जवळील एमआयडीसी ,वेस रोड , सावळीविहीर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष अशोकराव काळे हे उपस्थित राहणार आहेत. शिर्डी-सावळीविहीर येथे एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर येथील जागेमध्ये साफसफाई करण्यात येऊन रस्ते करण्यात आले आहेत. पाणी साठवण बंधाराही करण्यात आला असून या जागेमध्ये प्लॉट नंबर वन /वन येथे ही कंपनी होणार आहे. प्रथमच या निंबे समूहाचे सरंक्षण कंपनीचे येथे भूमिपूजन होणार असून या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तथा चेअरमन गणेश रमेश निंबे यांनी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .या कंपनीच्या भूमिपूजनाचा समारंभ सोमवारी होत असून परिसरातून त्यामुळे मोठे समाधान व्यक्त होत आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या येथील नवीन एमआयडीसीत औद्योगिक कंपन्या येण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच या कंपनीचे भूमिपूजन होत आहे.परसरातील तरुणांना त्यामुळे मोठा रोजगार मिळणार आहे .त्यामुळे या परिसरात मोठा आनंद व्यक्त होत आहे. या प्रकल्प संदर्भात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की,जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी उभारी देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनी स्थापन होत असून, प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ सोमवारी सकाळी संपन्न होत असल्याची माहीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
देशाच्या संरक्षण व्यवस्थेत मोठे योगदान देणारे जिल्ह्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या निबे स्पेस या कंपनीचा देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला ग्लोब फोर्ज लिमिटेड प्रकल्प जिल्ह्यातील पहीला प्रकल्प असून शिर्डी येथे त्याची होत असलेली पायाभरणी नव्या औद्योगिक विकासाची सुरूवात असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, उद्योग मंत्री उदय सामंत, आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजाता विकसित होत असलेल्या नव्या औद्योगिक वसाहतीच्या जागेत होणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
निबे स्पेस या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सामुग्री तयार केली जाते. शिर्डी येथील प्रकल्पातून अत्याधुनिक तोफखाना शेल्स उत्पादन होणार असून देशाच्या संरक्षण व्यवस्थेत योगदान देण्याचे कार्य करणारा प्रकल्प शिर्डीत सुरू होणे ही खूप अभिमान असल्याचे डॉक्टर सुजय विखे पा. यांनी म्हटले आहे.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे )
0 Comments