शिर्डी ( प्रतिनिधी)
राहाता तालुकास्तरीय शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 पारितोषिक वितरण कार्यक्रम प्राचार्य डा. राजेश बनकर( जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर,)जिल्हा समन्वयक श्री.कैलास सदगिर,संपर्क अधिकारी डॉ.गणेश मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भास्कर पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडुस ,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,विस्तार अधिकारी विष्णु कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच उत्साहात पार पडला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 11 मे 2023 नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या ,सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक /माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक,मुख्याध्यापक व प्रशिक्षक यांच्यासाठी गटनिहाय व विषयनिहाय स्पर्धा सन 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धांमध्ये तालुकास्तरावर 28 शिक्षकांची तालुका स्तर समिती गठित करुन निवड करण्यात आली होती. त्यातील 5 शिक्षकांचे व्हिडीओ जिल्हास्तर स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर निवड झालेल्या 28 शिक्षकांना दिनांक 28 मार्च 2025 रोजी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. वाघेरे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र , ट्रॉफी व प्रथम परितोषिक प्राप्त शिक्षकास 3000 रु. दितीय 2000 रु व तृतीय पारितोषिक विजेत्यास 1500 रु धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.मिशन आरंभ उपक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षकांनाही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री.सुनिल लोमटे सर,व श्री दिलीप दहिफळे सर यांनी उत्कृष्ट केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दत्ता गायकवाड सर यांनी केले ,तर कार्यक्रमाचे आभार सुनिल लोमटे सर यांनी मानले.
0 Comments