शिर्डी ( राजकुमार गडकरी) संपूर्ण विश्वाला सर्व धर्म समभाव व श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिकवणीचा खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्यक्ष जीवनात आचरण करत लहान थोर,
उच- निच, गोरगरीब, तळागाळातील अश्या सर्वांचेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ,लेखणीच्या माध्यमातून प्रश्न समस्या मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिर्डी साई न्यूज २४ या चॅनेल चे संपादक पत्रकार प्रशांत अग्रवाल यांचा आज 3 मार्च 2025 रोजी वाढदिवस असून त्यांचेवर वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पत्रकार प्रशांत अग्रवाल हे शिर्डी येथील तरुण व सर्वांशी मिळून मिसळून असणारे दिलखुलास व नेहमी हसतमुख असे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे .सर्वच क्षेत्रात त्यांना ज्ञान व जाण आहे. त्यामुळेच अल्पावधीतच त्यांचा पत्रकारितेमधील आलेख उंचावत चालला आहे. ग्राउंड लेव्हलला राहून त्यांचे सातत्याने काम सुरू असते. शोध पत्रकारिता करणे हा त्यांचा एक छंद आहे. चांगल्या गोष्टीची वाहवा करणे. मात्र वाईट किंवा असत्य गोष्ट असली तर कोणत्याही दबावाला बळी न पडता ती उजेडात आणून त्याचा पद्राफाक्ष करण्याचं काम ते आपल्या लेखणीतून करत असतात. कोणत्याही प्रश्न किंवा समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे सातत्याने दखल घेऊन पाठपुरावा करत आपल्या लेखणीतून, चॅनल मधून सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपला श्री साई चावडी मंदिराजवळ छोटासा व्यवसाय सांभाळत आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, शिर्डी ग्रामस्थ व परिसरातही त्यांनी आपले स्नेहभावाचे प्रत्येकाशी संबंध जपले आहेत. श्री साईबाबांवर मोठी श्रद्धा तसेच सर्वच गोष्टीत शांतता ,सबुरी हा त्यांचा व्यक्तिमत्वमधला मोठा गुण आहे. कोणाशी कधी वाद, भांडण नाही. कुठेही, कधीही कोणाशीही स्पर्धा नाही. आपल्या परीने जे करता येईल ते करत राहणे हा त्यांचा स्वभाव गुण त्यामुळेच ते आपल्या
व्यवसाय व पत्रकारिता याबरोबरच सामाजिक कार्यातही सातत्याने अग्रेसर असतात. शिर्डीत एखाद्या साई भक्ताला काही अडचण आली किंवा समस्या निर्माण झाली तर त्या सोडवण्याचा त्यांचा आपल्या परीने जे करता येईल. तसा प्रामाणिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे गणेश उत्सव असो नवरात्र उत्सव असो यामध्ये ते हिरारीने सहभागी होत असतात. आपल्यातील दिलखुलास स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.
स्पष्ट वक्तृत्व, प्रामाणिक कर्तुत्व, कोणी भेटलं तर हसतमुखाने करणार आदरतिथ्य, असं सरळ स्वभाव व दिलखुलास असणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत अग्रवाल हे शिर्डीच नव्हे तर सर्व परिसरातही एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व समजलं जात असून त्यामुळे त्यांचा वाढदिवस सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरां पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे .प्रत्येकाकडून त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. सत्कार होत आहेत. पत्रकार प्रशांत अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त आमच्याही हार्दिक शुभेच्छा आहेत.
0 Comments