राजकीय क्षेत्रात पूर्वीपासून मोठा राजकीय वारसा असणारे राहाता तालुक्यातील युवा नेतृत्व-सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रा. सदस्य गणेश एकनाथराव पा. आगलावे

शिर्डी (राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तसेच भाजपाचे तालुका युवा नेते गणेश एकनाथराव  पा.आगलावे यांचा आज सोमवार तीन मार्च 2025 रोजी वाढदिवस असून तो मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 


वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 ‌ गणेश आगलावे हे सावळीविहीर बुद्रुक तालुका राहाता येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते असून ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे आजोबा कै. विश्वनाथराव पाटील आगलावे हे सावळीविहीर बुद्रुक येथील राजकारणात मोठे व प्रतिष्ठित असे नेतृत्व होते. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाला राजकीय मोठा वारसा आहे. 

 कै. विश्वनाथ पाटील आगलावे यांचे  चिरंजीव कै. एकनाथराव पा. आगलावे हेही राजकीय क्षेत्रात एक प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्त्व समजले जात होते. ते सोसायटीचे चेअरमनही होते. व त्यांचेच सुपुत्र गणेश आगलावे हे सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका पदाधिकारी आहेत. त्यांची भावजई सौ. रूपालीताई संतोष आगलावे या मागील  वेळी पाच वर्ष सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या  सरपंच होत्या.व आता गणेश आगलावे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. असा राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबात पूर्वीपासून चालत आलेला असून राजकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव असो वा श्री परशुराम महाराज यात्रा ,श्री भवानी माता यात्रा असो किंवा साई चरित्र पारायण असो , हरिनाम सप्ताह असो येथे ते सातत्याने कार्यरत असतात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंवा हायस्कूल मध्ये कोणत्याही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती  असते. शिर्डी मध्ये आपला व्यवसाय सांभाळीत आपली 
सावळीविहीर येथील शेती ही ते करतात. ते एक प्रगतशील शेतकरीही आहेत. व्यवसाय तसेच शेती करत असताना सामाजिक ,राजकीय, क्षेत्रातही ते नेहमी पुढे असतात. सर्व क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. साईबाबांच्या श्रद्धा सबुरी व सर्वधर्मसमभावाची शिकवण अंगीकारत त्यांची राजकीय, सामाजिक वाट सातत्याने पुढे पुढे चालली असून ग्राउंड लेव्हल पासून तर विविध मोठ्या क्षेत्रापर्यंत त्यांची ओळख, प्रयत्न,व प्रामाणिक काम यामुळे त्यांचे मित्र मंडळ ही मोठी आहे. प्रामाणिक पणे व निस्वार्थी भावनेने काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. 

 स्पष्ट वक्तृत्व, प्रामाणिक व निस्वार्थी कर्तुत्व, सरळ व दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे गणेश एकनाथराव आगलावे हे एक युवा  नेतृत्व असून त्यांचा आज वाढदिवस आहे. हा त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मित्रमंडळींकडून व हितचिंतकांकडून साजरा होत आहे. गणेश आगलावे यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियावर त्यांच्यावर विविध क्षेत्रांमधून, मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्याकडूनही हार्दिक शुभेच्छा आहेत.
(सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी)

Post a Comment

0 Comments