अध्यात्मिक चर्चा केली. यावेळी अंदरसुल ग्रामस्थांच्या वतीने व ह भ प संजयजी महाराज यांच्या हस्ते अमितजी कपूर यांचा सन्मान करण्यात आला. आमितजी कपूर हे दिल्ली येथील रहिवासी असून त्यांचे महाराष्ट्रात नेहमी येणे जाणे असल्यामुळे ते मराठी भाषा चांगली समजतात. शिवाय ते पांडुरंगाचे भक्त आहेतच पण पंढरपूरला दर्शनाला आल्यानंतर आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जातात तसेच शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला नेहमी येत असतात. त्यामुळे त्यांना संतांची भूमी असणाऱ्या या महाराष्ट्राची व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची मोठी आवड निर्माण झालेली आहे व त्यामुळेच त्यांची व हभप संजयजी महाराज जगताप यांची आळंदी येथे ओळख झाली व तेव्हापासून ही आध्यात्मिक मैत्री सुरू असून दिल्ली कुठे आणि अंदरसुल कुठे तरी अध्यात्मिक मैत्रीने हा भेटीचा योग जुळून आणलाच शिवाय त्यांनी श्रीक्षेत्रं अंदरसुल येथे सुरू असलेल्या नाम सप्ताहास पंगतही दिली. अमितजी कपूर हे नुकतेच शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते श्रीक्षेत्र अंदरसुलला गेले होते. तेथे त्यांनी नाम सप्ताहात हभप संजयजी महाराज जगताप यांची भेट घेतली.
आपण येथे आलो. सर्व दर्शन झाले .यामुळे मनाला खूप मोठा आनंद व समाधान मिळाल्याचे आमितजी कपूर यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी बोलताना हभप संजय जी महाराज जगताप म्हणाले की,महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व या महाराष्ट्रातील संतांचा प्रभाव देशातील सर्वच राज्यात दिसून येतो. एक आध्यात्मिक असा संतांचा वारसा या महाराष्ट्रातून देशभर गेला आहे. हे यातून दिसून येते.महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज ,संत गजानन महाराज, संत साईबाबा, संत गोंदवलेकर महाराज आदी संतांची भक्ती, उपासनेची जी परंपरा आहे. त्या परंपरेची अमितजी एकरूप होऊन मनोभावे भगवंताची आणि संतांची उपासना करतात. मागील वर्षी आळंदी येथे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा होता. त्या संजीवन समाधी सोहळ्याला श्री क्षेत्र पंढरपूर वरून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पायी दिंडी सोहळा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पालखीसह आळंदीला आलेला होता आणि जिथे भगवान पांडुरंगाची पालखी इंद्रायणीच्या तीरावर थांबलेली होती. तिथे पांडुरंगाची पालखी ठेवलेली असताना पांडुरंगाचे चरण पादुकांचा अभिषेक व पूजा अमितजी मनोभावे करत होते. त्याच वेळेला आम्हालाही तेथे भगवान पांडुरंगाच्या चरण पादुका दर्शनाचा योग आला आणि सहस्त्र तुलसी दल पूजन विष्णुसहस्रनाम नावाचे स्तोत्र म्हणून त्यांचा अभिषेक चालू होती व त्या पूजेमध्ये आम्हालाही भगवंताच्या माऊलींच्या कृपाशीर्वादाने सहभागी होता आले .एक तास ती सर्व पूजा झाली व दर्शनही झाले. यावेळी आमची भेट झाली. अमितजी आणि आम्ही त्या वेळेला एक तास सहवासात होतो.एकमेकांचा परिचय झाला. त्यातून त्यांचा सहभाग जाणवला आणि पांडुरंगाच्या पालखी चरण पादुका बरोबर एक फोटो त्यांनी काढला आणि त्यामध्ये आमचा एक फोटो काढला आणि त्यांनी आमचा व्हाट्सअप नंबर घेतला आणि घेतल्यानंतर व्हाट्सअप च्या माध्यमातून ते आमचे दररोजच्या कीर्तन प्रवचनाचे स्टेटस बघू लागले व त्यातून त्यांना कीर्तन प्रवचनाची गोडी निर्माण झाली. मुंबई येथे त्यांचे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने येणे जाणे आहे .त्यामुळे त्यांना मराठी भाषा सुंदर प्रकारे कळते. आमच्या कीर्तनातील भावभक्तीचा भगवंतांनी हा संतयोग एकमेकाचा घडवून आणला आणि त्यातून एकमेकाविषयी आदर तयार झाला आणि ते इकडे महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून फोन करतात. यावेळी तर ते थेट शिर्डीहून श्रीक्षेत्र अंदरसुल येथे भेटायला आले. त्याचप्रमाणे येथील नाम सप्ताहाला त्यांनी भेट देऊन पंगतही दिली. ग्रामस्थांनी त्यांचे धन्यवाद मानत त्यांचा सत्कार केला.ते एक शुद्ध सात्विक भगवंताचे भक्त आहेत. दिल्लीतही ते वारकरी संप्रदाया बरोबरच अध्यात्मकतेचा प्रचार प्रसार करत असतात. असे प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री क्षेत्र अंदरसुल येथील ग्रामस्थ, वारकरी, भजनी मंडळी उपस्थित होते.
0 Comments