अज्ञातांनी शेतात जमा केलेला गहू ला लावली आग,दहा मिनिटांत 45 क्विंटल गव्हाची राख, गोंदेगाव येथील घटना--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02 -तालुक्यातील गोंदेगाव शिवारात काढणी साठी जमा केलेल्या गव्हाच्या रासला शनिवारी रात्रीच्या सुमारास नऊ वाजता अज्ञातांनी आग लावून या आगीत गव्हाची रास जळून खाक झाली असून अवघ्या दहा मिनिटात 45 क्विंटल गव्हाची राखरांगोळी झाली आहे 


या आगीत गव्हाच्या शेजारी च असलेल्या केळी च्या बागेत आग पोहचल्याने केळी चे शंभर झाडे आगीत भस्मसात झाले आहे या घटनेत तब्बल 45 क्विंटल गव्हा सह केळी बागा असे तीन लाख रु चे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल व कृषी विभागाने केला आहे..
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील अनुप महालपुरे यांच्या गट क्र-116 मध्ये तीन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या गहू पिकांची कापणी करून काढणी साठी गोळा करून ठेवलेल्या गव्हाला शनिवारी रात्री अज्ञातांनी चारही बाजूंनी आग लावून घटनास्थळवरून पोबारा केला दरम्यान ही घटना लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी आगीचा वणवा विझविण्यासाठी घटनास्थळी आले असता तोपर्यंत अवघ्या दहा मिनिटांतच गव्हाची राखरांगोळी झाली होती यामध्ये आगीचा वणवा केळी च्या बागेत पोहचल्या मुळे शंभर केळी चे खोड जळाले आहे व शेड नेटच्या दोन पट्ट्या जळल्या आहे याप्रकरणी महसूल चे मंडळ अधिकारी लक्ष्मण जाधव व तलाठी राऊत यांच्या सह कृषि विभागाने संयुक्त पंचनामा केला असून तीन लाखाचे नुकसान झाल्या चे पंचनाम्यात नमूद आहे.
(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments