शेतकरी कर्जमुक्ती साठी शेतकरी संघटनेचा एल्गार.


राहाता( सत्तेचा महासंग्राम न्युज )

शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील कृर्षी आयुक्त कार्यालयावर सपुण॔ कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा यासाठी मोर्चा जाणार आहे त्याचे नियोजन व नियंत्रण देण्यासाठी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अजित दादा काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडी खंडोबाची तालुका राहाता गावातील हनुमान मंदीर या ठिकाणी बैठक झाली श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजीराव लहारे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .

याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी प्रस्तावित भाषण करून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी प्रश्रावर अंदोलन करून तसेच न्यायालयीन लढाई देऊन निळवंडे कालवे करण्यासाठी न्याय मिळवून दिला आणि श्रीरामपुर तालुका येथील ९ गावातील शेतकरी यांची १०६ वर्षापासून अकारी पडीत ७५०० हजार एकर जमीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालय लढा दिला याबद्धल अभिनंदन व जाहीर आभार मानले आपल्या प्रमुख भाषणात काळे साहेब शेतकरी बंधू भगिंनीनी १९ मार्च रोजी कर्जमुक्ती करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सात बारा कोरा होईल शेतकरी संघटनेचे दूध आंदोलन ऊस अदोंलन यशस्वी झाले.

 देशातील भाजपा सरकार ने शेतकरी विरोधी भुमिका घेत कुठल्याही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही याचे कारण आपण संघटित होत नाही याचा फायदा केंद्र सरकार ने घेतला आहे तरी आपल्या मागण्या साठी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी अंदोलनात सहभागी व्हा शिवाजी तात्या यांनी म्हटले की वाकडी गावातील आम्ही किमान शंभर शेतकरी पुणे येथील कृर्षी आयुक्त कार्यालयावर मोर्चा साठी आणू असे जाहीर केले सदर बैठकीस शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आनील औताडे घोड़े वकील कापसे वकील शंकरराव लहारे सुरेश आबा लहारे मच्छींद्र एलम सावळेराम आहेर महेश लहारे डाॅक्टर नवले डाॅक्टर आदीक संजय भवार प्रकाश पाडांगळे श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक आलेश कापसे आहेर बी एल सर संजय शेळके रविंद्र शेळके संजय गोरे भागवत गोरे संजय एलम कैलास मोमले भगवान खरात असे अनेक कार्यकर्ते  शेतकरी हजर होते.सदर दौरे मध्ये शेतकरी संघटनेचे सचीन वेताळ बाबासाहेब वेताळ प्रचार गाड़ी फिरवून गावोगाव बैठका घेत आहे याबद्धल विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments