अहिल्यानगर (प्रतिनिधी) यूवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राहुरी तालुका कार्यकारीणीची बैठक नुकतेच रविवार दोन मार्च 2025 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार, जिल्हा प्रमुख मार्गदर्शक प्रभंजन कनिंगध्वज सर, जिल्हा विधी सल्लागार दिपकजी मेढे सर, विभागीय अध्यक्ष शरद राव तांबे यांचे मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव राजेंद म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रसंगी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक उपस्थित होते.
प्रसंगी राहुरी तालुका उपाध्यक्षपदी रमेशजी खेमनर, सचिवपदी सोमनाथ वाघ, तर उत्तर जिल्हा संघटन सचिवपदी रमेशजी जाधव, संघटन सहसचिवपदी राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार व प्रेस फोटोग्राफर देवराज मन्तोडे, सागर पवार, दिपक गायकवाड यांना तालुका कार्यकारीणीत स्थान देण्यात आले.
ज्येष्ठ सदस्य दिपक मकासरे, प्रमोद डफळ, सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व नवीन नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments