शिर्डी (प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री रोकडेश्वर हनुमान महाराज, श्री संत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व समर्थ सद्गुरु श्री संत
नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप.
(भऊरकर )यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण अशा शुक्रवार दि. 14 मार्च ते शुक्रवार दि. 21 मार्च 2025 दरम्यान पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एका पत्रकात देण्यात आली आहे.
दरवर्षी श्री रोकडेश्वर हनुमान महाराज पायी दिंडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूर ,श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र सरला बेट, आदी ठिकाणी हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र पैठण येथेही दिंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही शुक्रवार 14 मार्च 2025 ते शुक्रवार 21 मार्च 2025 या दरम्यान पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण असा आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 14 मार्च २००३ शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथून दिंडी सोहळ्याचे पूजन करून प्रस्थान होणार आहे. ही दिंडी वराडे वस्ती,शिरसगाव तालुका वैजापूर, तर दुसऱ्या दिवशी मांजरी फाटा तालुका गंगापूर येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे. पुरी तालुका गंगापूर ,तसेच शेकटा तालुका पैठण, ईसरवाडी तालुका पैठण असा हा पायी दिंडी सोहळा जाणार असून गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी हा पायी दिंडी सोहळा पैठण येथे पोहोचणार आहे. या दिवशी 20 मार्च रोजी गुरुवारी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान हभप संजयजी महाराज जगताप भऊरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेतही हभप
संजयजी महाराज जगताप यांचा काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर या दिंडी सोहळ्याचे सहमार्गदर्शक व अन्नदाते ॲड प्रमोद (दादा) मुरलीधर पाटील जगताप भऊरकर यांच्यामार्फत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या दिंडीचे श्रीक्षेत्र पैठण येथे अमोल भागवत, वडे नगर नारळा, पंचायत समिती शेजारी, पैठण येथे विसाव्याचे ठिकाण राहणार आहे. तरी इच्छुक वारकऱ्यांनी दिंडी प्रस्थानाच्या वेळी वेळेत उपस्थित राहावे. सोबत बिछाना घ्यावा , मौल्यवान वस्तू आणू नये. असे आवाहन करण्यात आले असून या पायी दिंडी सोहळ्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य ,महाराज मंडळी, भजनी मंडळी, दिंडीचे आयोजक व सर्व वारकरी परिश्रम घेत असून इच्छुक वारकऱ्यांनी पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे समस्त गावकरी मंडळी व भजनी मंडळी भऊर, तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. तसेच या दिंडी पायी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना चहा नाश्ता जेवण आदी दानशूर व्यक्तींचेही दिंडी आयोजकांनी धन्यवाद मानले आहेत.
0 Comments