श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडु आई मातेची यात्रा 13 एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार... ज्ञानेश्वर अहिरे

लोहगाव (वार्ताहर)

भिल्ल समाजाने येडुआई  अन्नदान सोहळा पालखिला भरभरुन मदत करावी असे आवाहन एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी तमाम भिल्ल समाजाला केले आहे.
ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे की, संपूर्ण राज्यातील भिल्ल समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडु मातेची यात्रा १३ एप्रील रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे.

या यात्रेत राज्यातील लाखो भिल्ल समाज सहभागी होत असतो.या सर्व भिल्ल समाजाला येडूआई अन्नदान सोहळा कमिटीच्या वतीने तीन दिवस चोविस तास महाभोजनाची व्यवस्था केली जाते.सध्या ही पालखी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये फिरत आहे.

 त्या मुळे ही पालखी ज्या गावामध्ये येईल त्या गावातील भिल्ल समाजाने आपल्या ऐपतीप्रमाणे गहू, तांदूळ,तेल,तूप,गुळ, अर्थीक मदत करावी.तूमच्या मदतीमुळे संपुर्ण राज्यातून येणारा भिल्ल समाज या ठिकाणी येऊन यात्रा संपेपर्यंत महाभोजनाचा लाभ घेता  येणार आहे.या अन्नदान कमीटीच्या वतीने प्रत्येक वर्षी अतीशय छान नियोजनबद्ध सर्व आदिवासींना भोजन दिले जाते.तरी तमाम भिल्ल समाजाने येडुआई अन्नदान सोहळा पालखिला भरभरुन मदत करावी  असे आवाहन ज्ञानेश्वर अहिरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments