टाकळीभान प्रतिनिधी:-टाकळीभान टेल टॅंक (गोविंद सागर) मधून शेतीसाठी चार दिवसांपासून आवर्तन सोडण्यात आले आहे, पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभारामुळे पाण्याचे नियोजन बेशिस्तीचे होत असून, पाणी वाटपाचे नियोजन कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ,शेतकरी संतप्त होऊन शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, असे प्रसिद्धी पत्रकार आनंदराव धुमाळ यांनी म्हटले आहे.
भंडारदरा स्थापनेपासून पाण्याचे रोटेशन सुटल्यानंतर चाऱ्यांद्वारे टेल टू हेड शेतकऱ्यांना पाणी वाटपाचा नियम असून सध्या पाटबंधारे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून टाकळीभान - घोगरगाव चारी नंबर १६ चे नियम बदलून हेड टू टेल नियम लावत आहेत. तरी पाटबंधारे विभागाने जास्त कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक करून पाणी वाटपावर लक्ष ठेवावे, टेल टू हेड या पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी वाटप करावे,व ज्या शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरले आहेत, त्यांनाच पाणी द्यावे , पाटकरी बिगर पाणी अर्ज भरलेल्या शेतकऱ्याकडून चिरीमिरी घेऊन पाणी देतात, त्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. व शेतकरी ऐकत नसतील तर पोलीस संरक्षण मागवावे या पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभारामुळे नियमाची पायमल्ली होत असून पाण्यासाठी सात नंबर फॉर्म भरलेला शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असून बिगर फॉर्म भरलेला शेतकरी पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पाणी मिळवत असल्याने प्रामाणिकपणे फॉर्म भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे धुमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.
0 Comments