कंकराळा येथील शेतकऱ्याने नऊ महिन्यांमध्ये तिन पिके घेऊन विक्रमी उत्पन्न घेत घडवला आदर्श--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.01 - सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील तरुण शेतकरी शंकर शांताराम लव्हाळे यांनी नऊ महिन्यामध्ये एका एकरात तीन पिकं घेत नवीन विक्रम केला आहे. 

सोयगाव तालुक्यातील कंकराळा शिवारातील  गट क्र. 79 मध्ये जुन महिन्यात एक एकर कलिंगड लागवड करीत 113  टन उत्पादन घेतले 16 रु.कि.प्रमाणे विक्री करत एक लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. पुन्हा ऑगस्ट महिन्यात कलिंगड लागवड करत 80 टन उत्पन्न घेत 13 रु. की. प्रमाणे विक्री करत एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.सोयगाव तालुक्यात प्रथमच बटाटा लागवड करण्याचा प्रथम मानकरी ठरत या शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबर ला एका एकरात आठ क्विंटल बटाटा बियाणे पिकाची लागवड केली त्यातून 80 क्विंटल बटाट्याचे उत्पादन घेतले व ते वीस रुपये किलो प्रमाणे विक्री करत एक लाख साठ रुपयाचे उत्पन्न मिळवले. या शेतकऱ्याने नऊ ते दहा महिन्याच्या कालखंडामध्ये तीन नगदी पिके घेत भरघोस असा नफा मिळवला. नऊ महिन्यात तिन पिकांमधून खर्च वगळता जवळपास साडेतीन लाख रुपये निवळ नफा कमावित, नऊ महिन्यातील तीन पिके घेण्याचा विक्रम केला.बटाटा लागवड करून उत्पन्न घेणारे तालुक्यातील पहिले शेतकरी ठरले आहे. कापूस.मका.पिकांकडे न वळता नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे वळून आपल्या मेहनतीने आपण शेती पिकात भरघोस असा नफा मिळवू शकतो व तंत्रज्ञानाची जोड आणि आपली मेहनत अशाप्रकारे शेती केली तर निसर्गाच्या  लहरीपणाला तोड देत आपण उत्पादन घेऊ शकतो असे नवतरुण शेतकरी शंकर लव्हाळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments