लोहगाव (वार्ताहर) : प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे टेक्निकल विभागाचे शिक्षक धनंजय गोपाळराव भोसले हे रयत शिक्षण संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्तीचा समारंभ महाविद्यालयात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य अलका आहेर या होत्या. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य संजय ठाकरे यांनी केले. यावेळी धनंजय भोसले या उभयतांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य संजय ठाकरे व उपप्राचार्य अलका आहेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दीपक धोत्रे, प्रकाश गहिरे, डॉ. शरद दुधाट, रामचंद्र डोळे, नानासाहेब गांगड, राजेंद्रकुमार क्षिरसागर, पवन भोसले, प्राचार्य गायकवाड सर, कडलक सर येनगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धनंजय भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सेवा करता आली, याबद्दल संस्थेचे आणि शाखेचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले. या समारंभास मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, नारायण जाधव, अनिल जाधव, माधुरी वडघुले, तानाजी सदगीर, रेणुका वर्पे, सौ. भोसले, प्रांजल भोसले, नळे सर, गोसावी सर यांच्यासह शिक्षक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट व अश्विनी सोहोनी यांनी केले. तर शेवटी देवेश आहेर यांनी आभार मानले.
0 Comments