दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02- सोयगाव तालुक्यातील तिडका येथे आमदार संजना जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांच्या हस्ते दि.02 रविवारी खेडीवाले स्टेडियम येथे करण्यात आले.
यावेळी क्रिकेटपटू उपस्थित होते. दरम्यान आमदार संजना जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तिडका येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने खेडीवाले स्टेडियम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि.02 रविवार पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.प्रथम पारितोषिक 31000/₹ आमदार संजना जाधव, द्वितीय पारितोषिक 21000/₹ हकीम शेठ, तृतीय पारितोषिक 11000/₹ माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे व ज्ञानेश्वर ओळेकर यांच्याकडून देण्यात आले आहे.स्पर्धेसाठी नितीन बोरसे, दिनेश जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.अखिर दादा, अफजल शेख,अलीम पठाण,समाधान भापकर,फईम पटेल,संतोष झलवार, आशु पटेल,जफर पटेल, ऋषिकेश झलवार,विनोद झलवार यांच्याकडून उत्कृष्ठ खेळाडूस बक्षीस देण्यात येणार आहे.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडावी यासाठी शांताराम जाधव,वसीम पठाण,संदीप परदेशी,अरुण परदेशी,विक्की पाटील,भैय्या परदेशी व भागचंद परदेशी हे परिश्रम घेत आहे. स्पर्धेची प्रवेश फी 2000/₹ असून जास्तीत जास्त संघांनी भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments