प्रसिद्ध ऑलम्पिक पट्टू मेरीकोम यांनी शिर्डीला येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन ! साई संस्थांनच्या वतीने त्यांचा करण्यात आला सत्कार!

‌शिर्डी ( प्रतिनिधी)प्रसिद्ध ऑलम्पिक पट्टू मेरीकोम यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.

 मेरी कोम ही एक भारतीय ऑलिम्पिक बॉक्सर आहे. ती मणिपूरमध्ये जन्मली होती. मेरी कोमने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. ती ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक जिंकणारी भारताची पहिली महिला बॉक्सर होती. 
मेरी कोमचे पूर्ण नाव मंगते चुंगनीजांग मेरी कोम हमांगते आहे. तिला 'मॅग्निफिसेंट मेरी' असे टोपणनाव आहे. 
ती बॉक्सिंग जगतात तिच्या  पंच आणि जबरदस्त कौशल्यांसाठी ओळखली जाते. तिने जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप सहा वेळा जिंकली आहे. 
ती एकमेव महिला आहे. जी पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकली. 
तिने २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने वंचित पार्श्वभूमीतील आकांक्षी बॉक्सरना प्रशिक्षण आणि समर्थन देण्यासाठी मेरी कोम रीजनल बॉक्सिंग फाउंडेशनची स्थापना केली. अशी प्रसिद्ध मेरी कोम यांनी शिर्डी येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments