स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा गुरूवारी कोपरगाव येथे सत्संग व पुजन सोहळ्याचे आयोजन!



कोपरगाव ( प्रतिनिधी)
निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना श्री क्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभ सोहळ्यात श्री शंभु पंचदशनाम जुना आखाडा यांच्या वतीने पिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते जगद्गुरु उपाशी मिळाली असून ते महाराष्ट्रातील ही उपाधी मिळालेले एकमेव संत आहेत.

 त्यामुळे जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे चरण पुजन व सत्संग पूजन सोहळ्याचे आयोजन गुरूवार दिनांक २० /०२ /२०२५ रोजी कोपरगाव येथे करण्यात आले आहे. येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल,श्री साईबाबा तपोभुमी मंदिराजवळ दुपारी १० ते ११ या वेळेत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. व ११ ते १२ या वेळेत स्वागत व पुजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कोपरगाव व कोपरगाव तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनासाठी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव  तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराकडून कळविण्यात आले.

Post a Comment

0 Comments