प्रामाणिकपणा व कष्टातूनच जीवन यशस्वी होते- ह.भ.प. संदीपजी चेचरे महाराज

लोहगाव (वार्ताहर)


प्रामाणिकपणा व कष्टातूनच जीवन यशस्वी होते असे प्रतिपादन ह. भ. प. संदीप जी चेचरे महाराज यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित शुभेच्छा समारंभात केले. महात्मा गांधी शैक्षणिक संकुल,  प्रवरानगर येथे आज दिनांक 17/02/2025 रोजी एस.एस.सी 2024- 2025  बॅचच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. 

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ह भ प संदीपजी चेचरे महाराज ,पत्रकार कोंडीराम नेहे पाटील , संकुलाचे प्राचार्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, उपप्राचार्या अलका आहेर, पर्यवेक्षक अनिल जाधव , सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राचार्य संजय ठाकरे, पत्रकार कोंडीराम नेहे, देवेश आहेर, कलिंदा कासार,रेणुका वर्पे , विद्यार्थी जगदीश आहेर ,युवराज काळे, सुजय म्हसे ,मयूर चेचरे, रहीम पठाण यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते 
सूत्रसंचालन यश कसबे ,संकेत भारमल ,ओम नरोडे, सौ.अश्विनी सोहनी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments