यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. मंगळवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान सर्व युवक, शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जमा होऊन सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत छत्रपतींना पुष्पहार अर्पण केला तसेच छत्रपतींना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने येथे व परिसरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुधवार19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सचिन शिवाजी आगलावे यांनी संपत्नीक अभिषेक केल्यानंतर छत्रपतींची गावातून ढोल ताशाच्या गजरात, भगवे फेटे व टोप्या घालून महिला पुरुष युवकांनी मोठ्या संख्येने भव्य पालखी मिरवणूक काढली. व त्यानंतर युवा ग्रामस्थ व आधार रक्तपेढी संगमनेर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . त्यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. तरी शिवप्रेमी नागरिकांनी युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. तसेच छत्रपतींच्या मिरवणुकीत, पालखी सोहळ्यात व विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन येथील समस्त युवा ग्रामस्थ व शिवप्रेमी युवकांनी केले आहे.
0 Comments