संजय महाळंकर पुरस्कृत मित्र साधना सहकार प्रगती पॅनल चा सोयगावात झंझावात, सोयगाव, सिल्लोड येथे वाढता पाठिंबा--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.19- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या  2025 ते 2030 या कालावधीसाठी होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संजय महाळंकर पुरस्कृत मित्र साधना सहकार प्रगती पॅनल च्या राजहंस दादासाहेब बाबुराव यांच्यासह पॅनलच्या उमेदवारांनी सोयगाव व सिल्लोड पंचायत समिती च्या कर्मचारी (मतदार) यांच्या भेटी घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांमधून पॅनलला वाढता पाठिंबा


 मिळत आहे. 11% वरून 8% पर्यंत व्याजदर कमी करून सभासदांना जास्तीतजास्तलाभांश देणार, गुणवंत विद्यार्थी सत्कार, एनपीएस/जीपीएफ च्या दोन्ही सभासदांना समान कर्ज, सर्व सभासदांना ऑनलाईन बँकिंग सुविधा पुरविणार,दरमहा वेतनातून कर्ज हप्ता कपातीनंतर हप्ता जमा झाल्यानंतर संदेश सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, 9.5 कोटी गंगाजळीच्या रकमेमधून सर्व सभासदांना नवीन उपयुक्त सामाजिक भवन उभारणी करणार, सभासद सेवेत असताना आकस्मिक मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जावरील व्याज माफ केले जाईल व कर्ज माफीसाठी विमा कवच सुविधा उपलब्ध करून दिली जाईल,प्रत्येक महिन्याच्या शेड्युल मध्ये कर्ज किती शिल्लक आहे त्या रकान्यात माहिती देण्यात येईल, मासिक सभेची उपस्थिती मानधन भत्ता कोणतेही संचालक घेणार नाही, सभासदांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवारास 15 हजार रुपये मदत अनुदान दिले जाईल व तातडीच्या व मोठ्या कर्जाची मर्यादा वाढविण्यात येईल असे मित्र साधना सहकार प्रगती पॅनलच्या वतीने जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान  सतीश प्रल्हादराव,गजहंस दादासाहेब बाबुराव, गवळी योगेश दत्तात्रय, पाटेकर अशोक बाबुराव,बिडाईत ज्ञानेश्वर कारभारी,महाळंकर संजय भानुदासराव,वाघचौरे शांतीनाथ कचरू,सोनवणे ज्ञानेश्वर श्रीराम, पवार महादेव शामराव, काथार गणेश विठ्ठलराव, वाघ प्रमोद भटु, परदेशी सुनीता रामचंद्र व सहाने शैला किसन या मित्र साधना सहकार प्रगती पॅनलच्या कपबशी या निशाणीवर दि.23 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान  करण्याचे आवाहन पॅनल प्रमुख संजय महाळंकर यांनी केले आहे. दरम्यान पॅनलला जिल्ह्यात वाढता पाठिंबा मिळत आहे.भेटी दरम्यान महेंद्रसिंग पाटील,पडघम,बदर,ढमाले,पैठणे, निवृत्त कर्मचारी सुभाष जाधव, बलदेव पुरी आदींसह पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments