टाकळीभान प्रतिनिधी : मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसांचे कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागीय 'टॉप कॉप ऑफ द मंथ 'ही योजना जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अनिल शेंगाळे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल ' टॉप कॉप ऑफ द मंथ ' या योजनेअंतर्गत निवड झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे व प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. अनिल शेंगाळे यांनी आपल्या सेवेची जबाबदारी चोखपणे पाळून उत्कृष्ट काम केल्याने त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या या गौरवा बद्दल बद्दल टाकळीभान येथील पदाधिकारी, पत्रकार व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.(सहयोगी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळीभान)
0 Comments