प्रदेश निष्ठ असलेले मेहरूण प्रजातीचे बोरं होत आहे नामशेष,जगात फक्त्त जळगाव च्या मेहरूण तलावा काठी नैसर्गिक आढळ-----संवर्धनासाठी बोरांच्या प्रजातीस कवीयत्री बहिणाबाई यांचे नाव देण्यासाठी डॉ. संतोष पाटील यांनी घेतला पुढाकार--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.16 -- जळगाव शहरापासून 3 किमी अंतरावर मेहरूण गावाजवळ तलाव आहे.त्या तलावाच्या आजूबाजूला हजारो अत्यंत गोड, तपकिरी रंगाची, छोट्या लांबट आकाराची बोरांची झाडे आहेत.ही वैशिष्ट्य पुर्ण झाडे भारतात इतरत्र नैसर्गिक रित्या कुठे ही आढळत नाही.मात्र हजारोने असलेल्या झाडांची संख्या अलीकडे 20 वर्षात झपाट्याने घटली व आता केवळ 22 च झाडे इथे उरली आहेत.याचे महत्वाचं कारण म्हणजे जळगाव शहराचा या बाजूने मोठा विस्तार झाला, जमिनीला 7 ते 8 कोटी रु इतका भाव आला व तलावा काठच्या जमिनी विकल्या जाऊन, भौतिक विकास होऊन मानवी वसाहती उभ्या राहिल्या व ही जैवविविधता लोप पावली. येत्या 5 वर्षात एक ही झाडं या मेहरूणचे शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे. लाल मुरमाड मातीत ही झाडे उभी आहेत.विशेष म्हणजे या बोरांना 2 वेळा फल धारणा होते, पहिली नोव्हेंबर व दुसरी जानेवारीत, ज्यास खिरनी म्हणतात.

        --मेहरूण व औरंगजेब यांचा संबंध-- औरंगजेबाची बऱ्हाणपूर ला छावणी होती व त्याची मुलगी मेहरुनीसा हिची जळगाव भागात जहागिरी होती.तिला ही बोरं खुप आवडायची. जळगाव जवळच्या तलावाच्या परिसरातील बोराच्या झाडांना मेहरुणीसाचे आवडती बोरं यावरून मेहरूणची बोरं असे नाम विधान झाले अशी जळगाव गॅझेटमध्ये नोंद आहे. 
    ----या नष्ठ होत जाणाऱ्या स्थानिक तथा प्रदेश निष्ठ ( इंडेमिक) वृक्ष प्रजातीचे संवर्धन, रोपण, पुनर्जीवन व्हावे म्हणून वृक्ष / जैवविविधता संवर्धक सिल्लोड येथील डॉ. संतोष पाटील यांनी 2 वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहेत.या बोरांचे बीज संकलन करून रोपे बनवून ती बहुली , छ. संभाजी नगर जवळील साई टेकडी वरील जैव विविधता  प्रकल्पात  रोपण करून वाढवली आहेत. मेहरूण येथे असलेली ही दुर्मिळ व 100 वर्षाहून अधिक वयाची व एक हजार वर्षांपासून इथे असलेली ही झाडे जतन व्हावी म्हणून त्यांनी स्थानिकांना याचे महत्व कळावे म्हणून वारंवार त्या गावी भेट देवून, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, यांना पत्र देवून यासाठी ठोस उपाय योजावे असी विनंती करून, स्थानिकांचे सकारात्मक सहकार्य प्राप्त करून घेतले आहे. 
      ---मेहरूण आता बहिणाई चं बोरं म्हणून ओळखलं जाईल --- मेहरूण च्या बोरांचा आकार,चव, रंग,बीज, झाडांची फुलं, पान,आकार,फलधारणा काळ  ह्या सर्व बाबी सर्व साधारण बोरंपेक्षा वेगळ्या आहेत. या सर्व नमुन्यांचा बायोस्पिर्स संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांच्या मदतीने टेक्सोनॉमिक स्टडी करून लवकरच या प्रजातीस वेगळी ओळख लाभणार आहे.बोरांचे शास्त्रीय नाव हें "झीझीपस  जुजुबा" असे आहे. जळगाव हें कवियत्री बहिणाबाई यांचे गाव. बहीनाबाई यांच्या काव्या इतकेच ही बोरं गोड आहेत.त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा म्हणून या प्रजातीचे " झिझीपस बहिणाई "( zizipus bahinaea " असे नामकरण व्हावे असा प्रस्ताव पाटील यांनी दिला आहे व लवकरच हें नामकरन होईल व संवर्धन कार्यास हातभार लागणार आहे.या तलावाकाठी  शेकडो विदेशी, हानिकारक वेडी बाभूळ उगली आहे तिचा ही फटका या बोरिस बसला आहे. 
    ----या ठिकाणी नांदते मोठी जैवविविधता-- ही बोरं लालबुड्या बुलबुल, राखी धनेश,रॉबीन, टोपीवाला कस्तूर, आदी पक्षी खातात.या पानांवर कॉमन सिल्वर लाइन, लिटल टायगर पिरोट, कॉमन पिरोट, चेस्ट नट- स्ट्रीक सेलर, लाईम स्वलो टेल आदी 9 प्रजातींची  फुलपाखरे अंडी घालतात ( होस्ट प्लांट ).फुलांवर अनेक मधमाशा, गांधील माशा जगतात. या परिसरात शेकडो पक्षी, फुलपाखरे अधिवास करतात. ही झाडे आता वाचणार असून खुप मोठी अन्न साखळी संवर्धीत होईल.
        डॉ. संतोष पाटील, सोयगाव- सिल्लोड ( सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments