बाभळेश्वर(वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाले.
रस्त्यावरील अपघातांमुळे दररोज शेकडो लोक जखमी होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती नसणे, अननुभवीपणा आणि निष्काळजीपणा ही या परिस्थितीमागची प्रमुख कारणे आहेत. म्हणून प्रत्येकाने Know The Road Safety Rules माहित करून घ्यावेत. घरी पालकांनी व शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि सर्वोत्तम पद्धती शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे.
यावेळी परिवहन महामंडळाच्या प्रभारी वाहतूक नियंत्रक श्रीमती मनीषा कुदळे या प्रमुख पाहुण्या होत्या. माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे, प्रमोद तोरणे, लातूर पॅटर्णचे बापू भोसले, शिवा क्षीरसागर, रामभाऊ शिंदे, मच्छिंद्र गोरे, श्री.कांबळे, श्री.आयुबभाई शेख, अविनाश गोरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments