मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा! महिलांचे हळदी कुंकवाचे ठिकठिकाणी कार्यक्रम !

शिर्डी( प्रतिनिधी )शिर्डी व परिसरात मकरसंक्रांत हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
 मकर संक्रांत निमित्त तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देत आनंदात हा सण साजरा झाला.
त्याचप्रमाणे घरोघरी अन्नधान्याची पूजन करण्यात आले.
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो. या पंरंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पुर्वजांचा एक चांगला हेतु असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दिपावली, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र, यांसारखाच आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकरसंक्रांत! मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन!मकरसंक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे हा सण कायम १४ जानेवारीलाच येतो (कधीतरी या सणाला १३जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपण पाहातो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी १४ जानेवारीला येतो) यावर्षी हा सण मकरसंक्रांत 14 जानेवारीला साजरा झाला. पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे.हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधीत अतिशय महत्वाचा सण असुन शेतीशी देखील संबंधीत आहे. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते (मकरसंक्रांतीपासुन ते रथसप्तमी पर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात.)
असं म्हणतात की या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात.
मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. (हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो) ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडयात भरून हे वाण महिला वर्ग ज्यापध्दतीने एकमेकिंना देतात.
सुवासिनी या दिवसांमध्ये हळदीकुंकवाचे आयोजन करतात.तर  बालगोपाळ आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधार्या माणसांसोबत पंतग उडवितात. भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केलेले होते. सर्वत्र मोठे उत्साहात पतंग उडवणे , महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेचे दिसून येत होते.

Post a Comment

0 Comments