निंबायतीच्या मोती माता यात्रेत मिठाई तोलणाऱ्या वजन काट्याचीच चर्चा, 60 वर्षांपासून नवसाला मिठाई तोलण्याचे काम-- ( नवरपुर्ती)



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.14 - सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील नवसाला पावणारी देवी मोती माता यात्रोत्सवात दि.13 सोमवारी  पहिल्या दिवशी तब्बल 159 जणांनी गोड धोड मिठाईचे वजन करून नवस फेडले आहे.


 दरम्यान गेल्या साठ वर्षांपासून नवसाला मिठाई तोलण्याचे काम करणाऱ्या त्या वजन काट्याचीच चर्चा यात्रेत होती पौष पौर्णिमेला निंबायती गावात मोती माता यात्रोत्सव सुरू होतो या यात्रोत्सवात नवस कबुल केलेल्या व्यक्तीच्या वजना इतकी मिठाई तोलुन प्रसाद म्हणून वाटप करण्याची प्रथा आहे दरम्यान सोमवारी या यात्रेत 159  जणांनी नवसफेडले असल्याचे वजन काटा तोलनारे गिरीधर पवार यांनी सांगितले आहे दरम्यान पहिल्या दिवशी निंबायती यात्रोत्सवात भाविकांनी मोठी गर्दी केली होती सोयगाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. पहिल्या दिवशी गोडधोड मिठाईने यात्रोत्सवची सुरुवात करण्यात येते यात्रेत मिठाईचे दुकाने लावण्यात येतात दरम्यान मोती मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती.सरपंच सुनीताबाई पाटील,उपसरपंच अर्चना राठोड, गावचे नाईक गजानन राठोड, राजू पाटील,धनसिंग राठोड, राजेंद्र राठोड,विशाल गोसावी,राहुल गोसावी आदींसह यात्रा कमिटीने पुढाकार घेतला होता.


Post a Comment

0 Comments