शिर्डी (प्रतिनिधी)
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ मुंबई या संस्थेच्या वतीने अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज (जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र) यांच्या राष्ट्रीय संशोधन संस्था यशवंत भवन, लोअर परेल मुंबई येथे मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवार 12 व सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी हा भव्य दिव्य असा हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात मुंबई येथील समाजसेवक व नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री प्रदीप विक्रम जाधव यांचा स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांनी पुष्पहार घालून त्यांना आशीर्वाद दिले. प्रदीप जाधव यांचे सामाजिक कार्य ,धार्मिक कार्य सातत्याने सुरू असते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्वामी नरेंद्रजी महाराज यांनी त्यांचा हा सन्मान केलाच, व आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान उपपीठ मुंबई या संस्थेच्या वतीने ही प्रदीप जाधव यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी श्री अशोकजी आग्रे, चंद्रशेखर जी पेडणेकर, सुहासजी खोकरे, शंकरराव जाधव, कुमार प्रशांत प्रदीप जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या सत्कार सोहळा कार्यक्रमानंतर समाजसेवक प्रदीप विक्रम जाधव यांनी सांगितले की, आज मकर संक्रांत निमित्त तसेच तिथीप्रमाणे राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंतीच्या दिनी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या हस्ते आपला सन्मान झाला व त्यांचा आशीर्वाद मिळतो. ही माझ्या दृष्टीने मोठी भाग्याची गोष्ट आहे. महाराजांच्या आशीर्वादाने व सन्मानामुळे आपणाला यापुढे आणखी ऊर्जा मिळाली असून यापुढे आणखी समाजकार्य, धार्मिक कार्य मोठ्या जोमाने करण्याची प्रेरणा त्यातून प्राप्त झाल्याचे त्यांनी यावेळी सांगत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ मुंबई या संस्थेचेही सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
मुंबई येथील प्रदीप विक्रम जाधव यांना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान मुंबई या संस्थेने सन्मानित केल्यानंतर त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
0 Comments