गणेश छल्लारे मित्र मंडळ व लोकसेवा विकास आघाडी भोकर यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान व बांधकाम कामगारांना कौशल्य विकास वृद्धीकरण प्रशिक्षण निवड कार्यक्रमाचे आयोजन



टाकळीभान प्रतिनिधी:-पत्रकार हा समाजाचा एक आरसा आहे. ज्याप्रमाणे समाजामध्ये घटना घडतात त्याचे प्रतिबिंब आरशाप्रमाणे  समाजाला दाखवण्याचे काम पत्रकार निर्भीडपणे करत असतो असे प्रतिपादन गणेश छल्लारे मित्र मंडळ व लोकसेवा विकास आघाडी भोकर यांच्या वतीने पत्रकार दिन व बांधकाम कामगारांच्या कौशल्य विकास वृद्धीकरण प्रशिक्षण निवड कार्यक्रम प्रसंगी लोकनेते मा आ.आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

        याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते मा. आ भानुदास मुरकुटे, मुळा प्रवराचे मा. संचालक सिद्धार्थ मुरकुटे,युवा नेते अशोक सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक नीरज मुरकुटे, अशोकचे मा. व्हाईस चेअरमन पुंजाहरी शिंदे, भोकरचे मा. चेअरमन गणेश छल्लारे, भैरवनाथ नगरचे सरपंच प्रवीण फरगडे ,हरेगावचे माजी सरपंच दीपक नवगिरे ,मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे , अशोकचे संचालक रामभाऊ कासार, ज्ञानेश्वर काळे,आणासहेब चौधरी आदी प्रमुख उपस्थित होते.

     यावेळी मुरकुटे बोलताना म्हणाले की समाजातील प्रत्येक घटकावर पत्रकारांचे नियंत्रण असते. आपल्या लेखणीतून जनजागृती करण्याचे काम पत्रकार करत असतो त्यामुळे समाजाचे स्वास्थ अबाधित ठेवण्याचे काम पत्रकारांकडून होते. गणेश छल्लारे यांचे बांधकाम कामगाराबद्दल जिल्हा व राज्यांमध्ये मोठे काम असून त्यांनी अनेक बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्य, भांडी, मुलांना शिष्यवृत्ती, आरोग्य निधी अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. सर्वसामान्यांशी नाळ असणारा हा कार्यकर्ता असून  ग्रामीण भागामध्ये सर्व पत्रकार बांधवांचा सन्मानाचा एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल गणेश छल्लारे यांचे कौतुक केले.
    याप्रसंगी पत्रकार भाऊसाहेब काळे, अर्जुन राऊत यांनी जगदंबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश छल्लारे यांच्या कामाचे कौतुक करून पत्रकारांच्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी गणेश छल्लारे म्हणाले की माझ्या राजकीय, सामाजिक जीवनात पत्रकारांचा मोलाचा वाटा असून, करत असलेल्या कामांना पत्रकार बांधवांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिल्यामुळे कामातील ऊर्जा व उत्साह वाढण्यास मदत झाली आहे. मुरकुटे साहेब यांच्याकडून व्यायाम, शिस्त, काटकसर या विविध गोष्टी शिकावयास मिळाल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करणार असल्याचे म्हणाले.
        याप्रसंगी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने, बांधकाम कामगार कौशल्य विकास वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत भोकर सह श्रीरामपूर तालुक्यातील ६४० नोंदणीकृत बांधकाम कामगारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली असून ४२००/रुपये शासकीय अनुदानासाठी पात्र झाले आहेत.अशी माहिती गणेश छल्लारे यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी परसराम खंडागळे पोलीस पाटील बाबासाहेब साळवे ,अण्णासाहेब वाकडे भागवत पटारे, गंगाराम गायकवाड, ठकसेन खंडागळे किशोर फुनगे ,कारभारी तागड, राजूभाऊ तागड ,ऋषी झीने ,सागर अमोलिक आदी उपस्थित होते. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते व दीपक नवगिरे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, व बांधकाम कामगार उपस्थित होते. सर्वांचे आभार पुंजाहरी शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments