दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी ना.संजय सिरसाट यांच्या नियुक्ती करण्यात आल्याने सोयगाव वगळता जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला. मात्र सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सोयगावात शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटात उदासीनता दिसून आली.
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या कारकिर्दीला सुरुंग लागला असून केवळ दोन हजार प्लस मतांनी ते विजयी झाले. विजयी झाले असले तरी कमी मतांनी झालेला विजय त्यांच्या जिव्हारी लागला. कमी मतांनी विजय, अनेक वादग्रस्त वक्तव्य यामुळे आमदार सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. दरम्यान ना.संजय सिरसाट व आमदार अब्दुल सत्तार यांच्यात जिल्ह्यातील सुरू असलेली गुंडागर्दी वरून एकमेकांवर टीकास्त्र डागले होते.
त्यातच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी ना.संजय सिरसाट यांची वर्णी लागल्याने सोयगाव शिवसेना (शिंदे गटात) उदासीनता पसरली आहे. एरवी आमदार सत्तारांना मंत्रिपद, पालकमंत्री पद मिळताच सोयगावात वेळेचे भान न ठेवता फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते उदासीन असल्याने ना.संजय सिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागल्यामुळे शिवसेना (सत्तारांचे ) कार्यकर्त्यांकडून या निवडीबद्दल जल्लोष करण्यात आला नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
0 Comments