अहिल्यानगर जिल्ह्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री!

शिर्डी (प्रतिनिधी) अनेक दिवस सुरू असलेल्या पालकमंत्रीच्या चर्चेला अखेर विराम मिळाला असून महाराष्ट्राच्या महायुती सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.


 अहिल्यानगरच्या पालकमंत्री पदी राज्याचे जलसंपदा मंत्री( गोदावरी व कृष्णा खोरे)नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यांचे पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमधून मोठा आनंद व्यक्त होत आहे.
त्यांच्या या पालकमंत्री पदी निवड झाल्याचे ठिकठिकाणी अभिनंदनचे बॅनर लावण्यात येत आहेत.ना. राधाकृष्ण विखे पाटील हे यापूर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

Post a Comment

0 Comments