टाकळीभान:: आज आपण पर्यावरण वाचवले तर ते उद्या आपल्याला वाचवेल असे प्रतिपादन कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई यांच्यावतीने पानेगाव तालुका नेवासा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर कार्यक्रम प्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जि. कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत यांनी केले. यावेळी निसर्ग व पर्यावरण या विषयावर ते बोलत होते.
यावेळी त्यांचे प्रथमतः स्वागत व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय जंगले, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बाळासाहेब खेडकर, डॉ. तुकाराम जाधव, डॉ. विशाल भांडले, प्रा. विशाल पवार, प्रा. कावेरी ढोकणे, प्रा. प्रतीक्षा कंक, प्रा.कल्याणी गाडेकर
आदी सह राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी राऊत बोलताना म्हणाले की माणूस हा नैसर्गिक प्राणी आहे. निसर्ग शिवाय त्याचे जीवन अशक्य आहे
पृथ्वीवर दहा टक्के बर्फ प्रमाण आहे, दिवसेंदिवस वितळण्याचे प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत आहे , त्यामुळे समुद्राची पातळी वाढू शकते. पृथ्वी म्हणून आपल्या सर्वांचेच घर आहे त्याची काळजी घ्यावी, यासाठी प्लास्टिक वाढू न देणे, वीज वाचवणे, दरवर्षी ३६० कोटी वृक्षतोड होते, तर लागवड १५० कोटी ते १९० कोटी होते, त्यामुळे वृक्षारोपणाची गरज आहे, औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण वाढत आहे, त्यामुळे दरवर्षी प्राणी संख्या कमी होत आहे, पर्यावरणाचा तोल ढासळल्यामुळे,पुर,, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या समस्या जाणवत असून व नैसर्गिक समतोल ढासळत आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनाचे काम अखंडपणे सुरू ठेवले पाहिजे पाणी बचत करणे, वेस्टीज जाणाऱ्या घटकांचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. बिघडलेली नैसर्गिक पर्यावरण घडी सुरळीत चालण्यासाठी पर्यावरणाचे काम करणे गरजेचे असून जल व्यवस्थापन पुनर्भरण, ओढे, नाले ,नदी, पशु ,पक्षी प्राणी यांचे जतन निसर्ग पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे.
याप्रसंगी माती, पाणी ,हवा याचे प्रदूषण व त्यावरील उपाय यावेळी त्यांनी विशद केले. रासायनिक खते ,वाढते प्लास्टिकचे प्रमाण माती दूषित करत आहे, तर हेच मातीचे घटक पाण्याशी संलग्न असून आणि दूषित होत आहे. वाढते औद्योगीकरण, व वाढती वाहने यामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. व हा वाढता कार्बन डाय-ऑक्साइड शोषणारी झाडे व मानवाला ऑक्सीजन देणारी झाडे कमी झाल्याने पृथ्वीवरील तापमान, उष्णता वाढत आहे. तसेच त्यास वाढते शहरीकरण, जंगलतोड ,वृक्षतोड हेही कारणे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. यासाठी मानव व समस्त सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे काळजी घेऊन त्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे.
याप्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले यांनी गावामध्ये आपण जास्तीत जास्त झाडे लावली असून, पानेगाव येथील नदीपात्रातील वाळू उचलू न दिल्याने येथील नदीच्या पाण्याचा परकुलेशनचा फायदा परिसराला होऊन येथील पर्यावरण टिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यावेळी निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या वतीने पानेगाव ग्रामपंचायत आवारामध्ये वड वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब खेडकर यांनी मानले.
0 Comments