श्री नर्मदेश्वर सेवा धामचे मंहत आत्मारामगिरीजी महाराज यांचे साधकासह प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी उत्साहात प्रस्थान!

"शिर्डी (प्रतिनिधी)
 चलो, चले कुंभ चले! पुण्यप्राप्तीचा सोहळा अनुभवण्यासाठी श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत अशोक महाराज निर्मल आत्माराम गिरीजी महाराज यांचे 144 वर्षानंतर आलेल्या महाकुंभ प्रयागराज कुंभमेळ्यासाठी नुकतेच प्रस्थान झाले आहे


. सोबत हरिभक्त परायण मनोज महाराज बिडवे आणि रोहित असा साधक वर्ग यांचा सहवास आहे. श्रीक्षेत्र नर्मदेश्वर सेवा धाम निर्मळ पिंपरी येथून रविवारी सकाळी महंत आत्माराम गिरीजी महाराज हे सावळविहीर येथील श्री हनुमान मंदिरात आले. तेथे त्यांचे स्वागत ह भ प मनोज बिडवे,साधक किशोर, योगेश पाचोरे, पत्रकार राजकुमार गडकरी यांनी केले.व  औक्षण सौ सुनीता गोकुळ जपे यांनी केले. व महाराजांचे आशीर्वाद घेतले.तसेच
महाकुंभ प्रयागराज प्रस्थान प्रसंगी हरिभक्त परायण राजूभाऊ पवार, सावळी विहीर यांनी अत्यंत श्रद्धेने व सेवाभावाने अन्नदान सेवा यावेळी संपन्न केली. व सेवाभावी कार्यासाठी महंत अशोक महाराज निर्मल आत्माराम गिरी, नर्मदेश्वर सेवा धाम यांच्याकडून शुभ आशीर्वाद घेतले.
राजूभाऊ पवार यांची निस्वार्थ सेवा व भक्तीमय कार्य कुंभमेळ्यातील पवित्र वातावरणात समर्पणाचा आदर्श निर्माण करणारे ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून त्यांचे जीवन अधिकाधिक आध्यात्मिकतेने भरून जावो, तसेच सर्व साधकांना कुंभमेळ्याची फलप्राप्ती मिळो अशी प्रार्थना मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी यावेळी केली . त्यानंतर आपल्या शिवशंभो कार रथातून 

ॐ नमः शिवाय!
ओम नमो नारायणा
व बम बम भोले!
 मस्ती मे डोले म्हणत!
नर्मदे हर! जिंदगीभर!
हर हर गंगे व हर हर महादेव चा नारा लगावत
मनमाड रेल्वे स्टेशनवर गेले. व तेथून तुलसी एक्सप्रेसने प्रयागराज कडे मोठ्या उत्साहात  कुंभमेळ्या साठी रवाना झाले. महाराजांना निरोप देण्यासाठी हरिभक्त परायण किशोर अहिरे, योगेश भाऊ पाचोरे, आणि राजूभाऊ पवार मनमाड स्टेशनवर हजर होते. सर्व गुरुभक्तांनी भक्तिभावाने निरोप देत महाराजांचे शुभाशीर्वाद घेतले.प्रयागराजकडे सुरू झालेली ही यात्रा
 आध्यात्मिक शक्ती आणि पुण्यसंचयासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सर्व गुरु भक्तांसाठी शुभाशीर्वाद व मंगल कामना!"असल्याचेही यावेळी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments