शिर्डी (प्रतिनिधी):- शिर्डी शहर हे
देश-विदेशात श्री साईबाबा मुळे प्रसिद्ध असे तीर्थस्थान बनले असून येथे देश-विदेशातून साईभक्त येत असतात, त्यामुळे येथे नेहमी साईभक्तांची गर्दी असते, अशा या गर्दीचा फायदा घेत येथे अनेक जडीबुटी विकणारे अनेक लोक आपले पाल मांडून रस्त्याच्या कडेला अशा जडीबुटी यांची विक्री अव्वाच्या सव्वा भावाने साई भक्तांना वेगवेगळे फायदे दाखवत करत असून साईभक्तांची त्यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होताना दिसून येत आहे,
त्यामुळे अशा या जडीबुटी विकणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे, शिर्डीत साईबाबांच्यादर्शनाला दररोज हजारोंच्या संख्येने साईभक्त देश-विदेशातून येत असतात येथे आल्यानंतर रस्त्याच्या कडेला अनेक जडीबुटी विकणारे पाल मांडून बसलेले आहेत, साईभक्तांना अनेक बोगस फायदे या जडीबुटीचे सांगितले जाते, अगोदर त्याची किंमत ही फारशी लावली जात नाही मात्र हळूहळू एकेक जडिबुटी वाढवत जाऊन हजारो रुपयाला साईभक्तांना गंडा घातला जातो, साईभक्त हे शिर्डीतून हे औषध घेऊन गेल्यानंतर आपल्या शहरात गेल्यानंतर या औषधाचा काही उपयोग होत नाही व आपण फसवले गेलो आहोत, हे त्या साईभक्तांना कळून चुकते, मात्र शिर्डीत परत येणे त्यांना शक्य नसते, त्यामुळे याचाच फायदा हे जडीबुटीवाले येथे घेत आहेत, जडीबुटी विक्रीच्या नावाखाली हे लोक साईभक्तांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घालत आहेत, साईभक्तांना वेगवेगळे फायदे व आमिष दाखवत त्यांची एक प्रकारे आर्थिक लूट करीत आहेत, त्यामुळे अशा जडिबुटी वाल्यांचा त्वरित शिर्डी नगरपंचायत, पोलीस व्यवस्थापन, आरोग्य विभाग यांनी दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व येथे हे जडीबुटीवाले पाल टाकून बसतात, त्यांना यापुढे तरी बंदी केली पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी निर्बंध लावले पाहिजेत, या जडीबुटी विक्री करणाऱ्या व पाल टाकून बसणाऱ्या लोकांना नगरपंचायतची ना पट्टी, ना वीजबिल , नाजागेचे भाडे, फुकट मध्ये कापडी पाल टाकून रस्त्याच्या कडेला हे बसतात, जडीबुटीची वेगळे बोगस फायदे दाखवत साईभक्तांची फसवणूक करीत आहेत, अनेकदा कोरोना संदर्भातही शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या जडीबुटीचे औषध काम येईल असे सांगत साईभक्तांकडून मोठी रक्कम लुटली जात आहे , परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील हे लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, साईभक्तांची आर्थिक लूट होणे थांबवण्यासाठी शिर्डी करांनी व नगरपंचायत पोलीस व प्रशासन यांनी ही याकडे लक्ष देणे गरजेचे असून तशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने राज्याचे कार्याध्यक्ष समीर अण्णा वीर यांनी केली आहे.
0 Comments