शिर्डी (प्रतिनिधी)
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला असून या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त राज्यात व शिर्डीतही पोहोचल्यानंतर शिर्डी व परिसरातून सैफ अली खान च्या चाहत्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे .या घटनेचा शिर्डी व परिसरातही निषेध होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या मुंबईत राहत्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ जखमी झाला असून लिलावती रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डिलेव्हरी बॉयचे कपडे घालून आलेल्या चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. सैफ अली खानच्या घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. घरात चोर शिरल्याचं समजल्यानंतर सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड ऐकून बाहेर नेमका काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी झोपेतून जागा झालेला सैफ अली खान बेडरुममधून बाहेर आला. सैफ जसा त्याच्या बेडरुममधून बाहेर आला तसा त्याच्या समोर हा चोर उभा असल्याचं दिसलं. एकीकडे चोर घरात शिरल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरु असतानाच सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी सैफला काही समजण्याच्या आधीच चोराने सैफ आपल्याला पकडेल या भीतने त्याच्याकडील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरचाकर तातडीने त्याच्या मदतीला धावले. त्यांनी सैफला लिलावती रुग्णालयात दाखल केलं. सर्वजण जखमी झालेल्या सैफच्या मदतीला धावल्याने या संधीचा फायदा घेत चोराने पळ काढला. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेचा संपूर्ण राज्यात निषेध करण्यात येत आहे. शिर्डी व परिसरातील सैफ अली खानच्या चाहत्यांमधून तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
0 Comments