प्रयागराज महाकुंभात आज मौनी अमावस्याला सर्वात मोठे अमृतशाही स्नान! सुमारे दहा कोटी भाविकांची झाली गर्दी!

शिर्डी ( प्रतिनिधी) प्रयागराज येथे 144 वर्षानंतर आलेला महा कुंभ मेळा सध्या सुरू असून मौनी अमावस्येला या महा कुंभमेळ्यातील सर्वात मोठे अमृत शाही स्नान आहे. त्यामुळे प्रयागराज येथे रेकॉर्ड ब्रेक अशी भाविकांची गर्दी संगम स्नानासाठी झाली असून सुमारे आठ ते दहा कोटी भाविक येथे आल्यामुळे आज प्रयागराज शहर जगातील सर्वात लोकसंख्या असलेले मोठे शहर एक दिवसासाठी झाले आहे.

 मौनी अमावस्येला सर्वात मोठी शाही स्नान असल्यामुळे सर्व १३ आखाडे व सर्व देश विदेशातील साधू संत महंत यांचे प्रथम शाहीस्नान होत आहे. आपल्या शिबिर आश्रमापासून प्रत्येक आखाडा मिरवणुकीने निघून संगमावर येत असून या साधू महंतांच्या मिरवणुका पाहण्यासाठी ही भाविक मोठ्या संख्येने  उभे असल्याचे दिसून येत आहे. शासनातर्फे मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. संगम व परिसरातील सुमारे 15 एकर जागेमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. असे राजराजेश्वरी आत्मारामगिरीजी महाराज यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments