बाभळेश्वर (वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे प्रवरा मेडिकल ट्स्ट च्या ग्रामीण दंत महाविद्यालय यांच्या वतीने व कुलपती राजेंद्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष दंत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तुकाराम बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक तान्हाजी बेंद्रे हे होते.
प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेची उदिष्टे, पार्श्वभूमी, शिबिरामध्ये राबवावयाचे उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती ग्रामीण दंत महाविद्यालयाचे सोशल वर्कर मंगेश कोळगे यांनी दिली. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ.सुनील बुलार, तान्हाजी बेंद्रे, तुकाराम बेंद्रे, अण्णासाहेब बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच सौ.संगीता श्रीकांत शिंदे, उपसरपंच प्रमोद बनसोडे, माहिती अधिकार कार्यकर्ते गोरखदादा गवारे, नानासाहेब सहादू बेंद्रे, सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाचे सुहास नानासाहेब बेंद्रे, शंकर रोकडे, तुकाराम शंकर बेंद्रे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गोंडे, डॉ.नामदेव बेंद्रे, डॉ.प्रशांत विरगी, डॉ.स्नेहल गाडेकर, डॉ.क्षितीज प्रधान हे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दंत महाविद्यालयाचे रुग्ण समन्वयक प्रतिक म्हस्के यांनी केले.
0 Comments