घोसला येथील पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा जामनेरला पाण्यात बुडून मृत्यू, सोयगाव तालुक्यातील घोसला गावात हळहळ--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.28 -जामनेरच्या प्रसिद्ध सोनबर्डी येथील स्विमिंग पुलाच्या पाण्यात सोयगाव तालुक्यातील घोसला येथील एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दि.28 मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोसला येथील पंधरा वर्षीय मुलगा हा मोठ्या भाऊ सोबत खोली करून जामनेर ला शिक्षण घेत होता.  प्रसिद्ध सोनबर्डी येथे फिरण्यासाठी गेला होता. तिथेच स्विमिंग पूल बघण्यासाठी संकेत निवृत्ती गव्हांडे(पाटील) हा आपल्या मित्रांसमवेत आला होता. मात्र अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. संकेत बुडण्याची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर लागलीच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
संकेत निवृत्ती गव्हांडे (पाटील) 15 वर्ष राहणार घोसला, ता.सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हल्ली राहणार हिवरेखेडा रोड, ता. जामनेर असं मयत मुलाचे नाव आहे.
जि एम फाऊंडेशन च्या रुग्णवाहिकेवरील चालक जालमसिंग राजपूत आणि अजून एक तरुणाने संकेतला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र काही वेळा नंतर संकेतचा मृतदेह मिळून आला.संकेत गव्हांडे(पाटील )हा जामनेर येथील शाळेत आठवी मध्ये शिकत होता. आज तो फिरण्यासाठी सोनबर्डी येथे मित्रांसोबत गेला होता. मात्र या दरम्यानच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सोयगाव सह घोसला परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.दरम्यान घोसला येथे बुधवारी सकाळी आठ वाजता त्याचे वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मराठा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सोपान गव्हांडे यांचा तो पुतण्या होता त्याच्या पश्चात आई,वडील,एकभाऊ,आजी,आजोबा असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments