राजकीय कितीही अशी वादळं आली किंवा शांत झाली तरी आपलं काम सुरू असतं--मा. मंत्री आ. छगन भुजबळ

शिर्डी ( राजकुमार गडकरी)
राजकीय कितीही वादळं आली किंवा शांत झाली तरी आमचं काम सुरूच असतं. असं म्हणत आपण  कितीही श्रद्धेने काम केलं तरी कोणी अश्रद्धेने  वागत असेल तर त्याला काय करणार? असा सवालही माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला.
शिर्डी मध्ये आमदार छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी आले होते. त्यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शनही घेतले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार छगन भुजबळ म्हणाले, राजकीय कितीही वादळ आली किंवा शांत झाली तरी आमचे काम सुरू असते .समता परिषदेला पस्तीस वर्षे झाली त्यामुळे समता परिषदेचे काम सभा मीटिंगा सुरू असतात. असे सांगत फुले शाहू डॉक्टर आंबेडकरांना मानणारे राज्यकर्ते आहेत. साई चरणी अनेक जण जातपात धर्मपंथ विसरून दर्शनाला येत असतात. तसी या राजकीय व्यवहारातही राज्यकर्त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे. असं सांगत आपण किती श्रद्धेने वागलो तर कोणी अश्रद्धेने पद्धतीने वागत असेल तर त्याला काय करणार ?असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपला मतदारसंघ येवला शिर्डी जवळच आहे ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी साई दर्शनाला येतो. आता तर अधिवेशन आहे व साई दर्शन ही झाले आहे. प्रफुल्ल पटेल यांना आपण सांगितले होते त्याप्रमाणे अधिवेशनाला हजेरी लावली आहे. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याशी संवाद झाला की नाही असे विचारताच नाही असे सांगत त्यांनी लाडक्या बहिणी योजनेस संदर्भात जे विचारायचे असेल ते राज्यकर्त्यांना विचारा असेही यावेळी सांगितले. साईंकडे आल्यानंतर नाराजी दूर होते. असे विचारताच साईंवर श्रद्धा आहे नेहमी दर्शनाला येत असतो. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही असे ते म्हणाले.

मात्र शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या अधिवेशनाला दोन तास हजेरी लावून आमदार छगन भुजबळ हे माघारी परतले. सुनील तटकरे यांनी विनंती केली म्हणून आलो असे सांगत मी श्रद्धेने वागलो. मात्र मला  अश्रद्धेने वागणूक दिली .अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यावरून आमदार छगन भुजबळ हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. हे स्पष्ट दिसून येत होते.व तशी चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

Post a Comment

0 Comments