शिंदोडीत सापडलेल्यादोनमुलांना गावकऱ्यांनी केले आईवडीलांच्या हवाली.
संगमनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पठार भागातील शिंदोडी या ठिकाणी अचानक रात्रीच्या वेळी दोन मुले सापडली होती येथील कर्तव्यदक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरुप त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की पठारावरील शिंदोडी या गावांमध्ये रात्रीच्या वेळी आठ वाजता दोन लहान मुले अचानक रस्त्याच्या कडेला घाबरलेल्या स्थितीत रडत बसलेले दिसले त्याचवेळी गावातील ग्रामस्थ पांडुरंग गायकवाड यांनी यांची विचारपूस केली त्यांनी रडत रडत सांगितले की आम्ही आमचे नाव अर्जुन दीपक पवार (वय ११) वर्षे व अरुण दशरथ बर्डे (वय ९) असुन आम्ही स्थापलिंग खंडोबा या ठिकाणी निघालो आहे आम्हाला तिथे सोडा परंतु वरवंडीत त्यांची कुठलीही ओळख पोहोचली नाही म्हणून वरवंडीतील रिपाईचे पठार भाग विभाग प्रमुख सागर शिंदे यांनी वरवंटी पंचक्रोशीतील सर्व व्हाट्सअप ग्रुपवर व माहिती असलेल्या सर्व वस्त्यांमध्ये या मुलांचे फोटो पाठवले. त्याचप्रमाणे खांबा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आहेर यांनी देखील त्यांच्या संपर्कातील सर्व लोकांना कळवले . यानंतर रात्री बाराच्या सुमारास या मुलांची ओळख पटली यांचे काका म्हैसगाव या ठिकाणचे आहे असे कळतात यांच्याशी सादर शिंदे यांनी संपर्क केला.यावेळी मुलांचे नातेवाईक म्हैसगावचे राहुल वसंत बर्डे म्हणाले आम्ही सकाळी शिंदोडीत येऊ असे आश्वासन दिले.सकाळी सागर शिंदे यांनी त्यांच्या आई-वडिलांकडून ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड घेतले व मुलांना त्यांच्या हवाली केले.त्यानंतर रात्री या मुलांना शिंदोडी येथील संतोष शिवराम बर्डे यांच्या घरी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे शिंदोडी गावचे ग्रामस्थ संतोष दादू गायकवाड यांनी सहकार्य केले.
यावेळी त्यांच्या आई-वडिलांनी सांगितले की आम्ही शिरुर तालुक्यातील काठापुर या ठिकाणचे रहिवासी असून मुले सकाळी घराबाहेर पडली व गायबच झाली. होती आम्ही त्यांना सर्वत्र शोधत होतो.पण ते सापडले नसल्याने आम्ही धास्तावुन गेलो होतो मुलांना बघताच आईच्या चेहऱ्यावर आनंद व डोळ्यात आनंदाश्रू आले त्यांनी शिदोंडी ग्रामस्थांची कृतज्ञता व्यक्त केली. काही दिवसांपासून या गावाच्या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असताना याच दरम्यान खडकवाडी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका तेरा वर्षाच्या मुलीला वाघाने जीवे मारले आहे अशी घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या सर्वांमधून मार्ग काढत रिपाईचे पठार भाग प्रमुख सागर शिंदे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आहेर वरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बकुळे,भाऊसाहेब माकरे,संतोष बर्डे ,पांडुरंग गायकवाड काशिनाथ पवार,संतोष गायकवाड राहुल बर्डे यावेळी उपस्थित होते.
0 Comments