ऑनलाइन नोंदणी करा, भाजपाचे सदस्य व्हा,सुनील गावंडे यांनी केले आवाहन--



दिलीप शिंदे सोयगाव

सोयगाव दि.18 -  राज्य आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. या माध्यमातून देशाचा विकास जलद गतीने सुरू आहे. जिल्ह्यालाही भाजपाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन शनिवारी भाजपनेते सुनील गावंडे यांनी केले.

सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात भाजपा सदस्यता नोंदणी महाअभियान राबविण्यात आले. 

याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील,संजय मोरे,गुरुदास पाटील आदींनी सोयगाव, जरंडी,निंबायती,आदी भागात दौरा करून अभियान राबविले. मोबाइलच्या सहाय्याने ऑनलाइन पद्धीने सदस्य नोंदणी करता येते. तशी सुविधा पक्षाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोयगाव तालुक्यातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यासाठी  सत्यजित सोनवणे, अमोल उबाळे,साईदास पवार,माधव महाराज मोहिते आदींनी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments