प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी गुरुवारी मध्यान आरतीला उपस्थित राहुन घेतले साई दर्शन!साईसंस्थांनच्या वतीने त्यांचा करण्यात आला सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी)
 प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद यांनी गुरुवार 2 जानेवारीला   शिर्डीला भेट दिली. व साई मंदिरात जाऊन दुपारच्या माध्‍यान्‍ह आरतीकरीता  ते उपस्थित राहुन त्यांनी आरती नंतर श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

 साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल, श्री साई मूर्ती देऊन सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते. तसेच यावेळी शिर्डी शहरातील माजी विश्वस्त सचिन तांबे, रमेश गोंदकर आदी उपस्थित होते.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सोनू सूद हा साईभक्त असून तो साई दर्शनाला शिर्डीत येत असतो. यापूर्वी ते आलेले आहेत.
अभिनेता, प्रोड्यूसर, मॉडेल,व सामाजिक कार्यकर्ता म्हणून सोनू सुदला ओळखले जाते. सोनू सूद हिंदी, तेलुगू, तमिळ, पंजाबी, कन्नड चित्रपटसृष्टीमधील एक सक्रिय अभिनेता आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याने हजारो गरजू लोकांना मदत केली होती. त्यामुळे सोनू सूद हे नाव संपूर्ण भारतामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. जोधा अकबर, हॅप्पी न्यू ईयर, अरुंधती, सिम्बा, अशोक, अपने, दबंग, आर राजकुमार अश्या अनेक चित्रपटात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
 सोनूने 'सूद चॅरिटी फाऊंडेशन' नावाची एक लोकोपयोगी संस्था चालू केली आहे. या संस्थेमार्फत अनेक गरजू लोकांना तो मदत करतो. असा हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद शिर्डीत आल्याचे समजताच त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी मोठे उत्सुक होते. काळी पॅन्ट व काळा टी-शर्ट घातलेल्या सोनू सूदला अनेकांनी  हात हलवून अभिवादन केले.


Post a Comment

0 Comments