शिर्डी ( प्रतिनिधी)
संतश्रेष्ठ सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांच्या 27 व्या पुण्यतिथी सोहळ्याचे शनिवार 11 जानेवारी 2025 रोजी श्री नर्मदेश्वर सेवाधाम, श्रीपाद शिव कुटी ,पिंपरी निर्मळ ,ता. राहता येथे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत अशोक महाराज निर्मळ उर्फ आत्माराम गिरीजी महाराज यांनी दिली आहे.
संतश्रेष्ठ सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांची 27 वी पुण्यतिथी शनिवार दि 11 जानेवारी 2025 रोजी असून या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने पिंपरी निर्मळ येथे श्री नर्मदेश्वर सेवा धाम, श्रीपाद शिव कुटी, येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींना पवित्र अभिषेक, त्यानंतर गुरुचरित्र पारायण आणि नामस्मरण होऊन दुपारी महाप्रसाद होणार आहे.
सायंकाळी सद्गुरूंच्या जीवन कार्यावर आधारित प्रवचन त्यानंतर संतवाणींचे अभंग गायन,भजने व त्यानंतर गुरुचरित्र आणि आत्मस्मरणाचा अनुभव घेण्यासाठी एकत्र नामस्मरण व त्यानंतर गुरुचरणी सामुदायिक वंदना होणार आहे. असे आत्माराम गिरीजी महाराज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की,
संतांच्या उपकारांचे वर्णन करणे अशक्य आहे. संत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांचे जीवन हे ज्ञान, भक्ती, आणि त्यागाचे आदर्श प्रतीक होते. त्यांच्या शिकवणींनी असंख्य भक्तांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रेरणेने अनेकांचे जीवन उजळले, अज्ञानाचा अंध:कार दूर झाला, आणि आत्मज्योतीचा प्रकाश प्रकट झाला. सद्गुरूंचे हजारो साधक आहेत.संतांच्या उपकारामुळेच आपण आत्मोन्नती साधू शकतो .म्हणूनच आपण सर्वांनी या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहून गुरुचरणी आपले कृतज्ञता व्यक्त करावी.व महान राष्ट्रसंत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांचा 27 व्या पुण्यतिथी निमित्ताने आशीर्वाद घ्यावा.व या पुण्यतिथी सोहळ्याची शोभा वाढवावी.असे श्री.नर्मदेश्वर सेवाधाम, श्रीपाद शिव कुटी, पिंपरी निर्मळ, तालुका राहता यांनी केले आहे.
0 Comments